Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > शेततळ्या विषयी माहिती /  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 1 reply 3754 Views Next Thread

FARMER

300+ Contributor
Bhandup
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 9, 2008
  Posts: 358
  Status: Offline

Farmer Name: Ravidra Tikade
Farmer Phone: 0 - 0


शेततळ्या विषयी माहिती /
   

नमस्कार,

मी कापूस, मोसंबी ही प्रमुख पिके घेतो, उन्हाळयात पाण्याची कमतरता जानवते.

तरी उपाय म्हणून शेततळ्या विषयी माहिती द्यावी.

रविंद्र तिकाडे

ता. अम्बड, जि. जालना.

 


[Dec 10, 2008 6:21:13 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: शेततळ्या विषयी माहिती /
   

शेततळे :

शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे.

शेतात शेततळे करून भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी त्यात साठवून त्याचा पाहिजे तेव्हा उपयोग करता येतो. मुख्यत्वे संरक्षित सिंचनासाठी, तसेच पाणी जिरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे यातून साधता येते.
पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. काही क्षेत्र रब्बी पिकाखालीही आणता येऊ शकते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. ज्या ठिकाणी जमीन जवळ जवळ सपाट असेल त्या ठिकाणी खड्डा खोदून तळे तयार करावे, तर काही ठिकाणी नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून किंवा नाला शेताजवळून वाहत असल्यास त्याला अडवून शेततळ्यात पाणी साठवता येते.

शेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी. कमीत कमी मातीकाम करून जास्तीत जास्त पाणी साठविता येईल, अशी जागा निवडावी. सभोवताली जमीन दलदल व चिबड होईल, अशा ठिकाणी शेततळे घेऊ नये. शेततळ्याचे आकारमान निश्‍चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्‍चित करावी. चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्‍चित करावी. शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे, ते पाणलोट क्षेत्र निश्‍चित करून त्याचे क्षेत्र मोजावे. शेतातील अपेक्षित अपधाव निश्‍चित करावा. एकूण अपधावाच्या ५० टक्के पाणीसाठा होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शेततळ्याचे आकारमान निश्‍चित करावे. शेततळे शक्‍यतोवर चौकोनी व खोल असावे.


शेततळी दोन प्रकारची असतात –
1) खड्डा खोदून तयार केलेली. 2) नाल्याला आडवा बांध टाकून पाणी अडवलेली.

शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्‍चित करावी.

शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या दोन ते अडीच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः दोन हेक्‍टर क्षेत्राकरिता 20 X 20 X 3 मी. (1200 घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे. शेततळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता ज्या क्षेत्रात मृद्‌संधारणाची कामे झाली आहेत, तेथेच घ्यावे, जेणेकरून पाण्यासोबत शेततळ्यात माती येण्याचे प्रमाण कमी राहील व पाण्याची साठवण योग्य प्रमाणात होईल. शेततळ्यात पाणी आत आणणारा चर व बाहेर पाणी वाहून नेणारा चर दगड किंवा गवत लावून व्यवस्थित ठेवावा. जेणेकरून वरील भागातील माती शेततळ्यात वाहून येणार नाही.

शेततळ्याच्या योजनेचा प्रस्ताव संबधीत तालुका कृषि अधिकारी यांचे कडे सादर करावा लागतो. ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा. कँनाल लाभ क्षेत्रामध्ये शेततळे खोदावयाचे असल्यास पाटबंधारे खात्यातर्फे ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.

आपल्या शेतामध्ये पडणा-या पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून गरजेप्रमाणे वापरता येते. तसेच परीसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होतो.

शेततळ्याच्या अनुदानाबाबत अधिक माहितीसाठी तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.


अधिक माहितीसाठी संपर्क -
डाँ.आर.एस.जाधव
कृषि विज्ञान केंद्र,
बारामती.
फोन – 02112-255207.

 

 

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत: च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)


----------------------------------------
[Edit 1 times, last edit by baramati at Dec 11, 2008 10:26:41 AM]
[Dec 11, 2008 10:23:14 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard