Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > शेवगा लागवडीबदल माहीती  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 3 Replies 5622 Views Next Thread

ankushkhutwad

30+ Contributor
pune
Maharashtra
India

  Joined: Sep 14, 2005
  Posts: 37
  Status: Offline


शेवगा लागवडीबदल माहीती
   
शेवगा लागवडीबदल माहीती दया. रोपे कीवा बीया कोठे मीळतील?
अंकुश.
[Jun 19, 2007 10:31:27 AM] Print Post    Email is hidden to Guest Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.Prasad Kaledhonkar
Phone Number: 2112255207


Re: शेवगा लागवडीबदल माहीती
   
शेवगा –
- शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते. सर्वसाधारणपणे २५ ते ३० डिग्री सें. तापमानात वाढ चांगली होते. तसेच तापमान ४० डिग्री सें. पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते.
- शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगरउताराच्या जमिनीत करता येते. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६-७.५ असावा.
- शेवग्यासाठी कोकण रुचिरा, पी.के.एम-१, पी.के.एम.-२, जाफना, चेम मुरंगा या वाणांचा वापर करावा.
- शेवग्याची अभिवृध्दी फाटे कलम अथवा बियापासून रोपे तयार करून केली जाते.
- फाटे कलम न मिळाल्यास पाँलीथीनच्या पिशवीत बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी. एक ते दोन महिन्यांची रोपे लागवडीकरीता वापरावीत. हेक्टरी लागवडीकरीता ५०० ग्रँम बियाणे लागते. बीयाणासाठी नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये चौकशी करावी.
- लागवड करण्यापुर्वी पावसाळ्यापुर्वी ६० X ६० X ६० आकाराचे ख़ड्डे घ्यावेत. हे खड्डे चांगली माती एक घमेले कुजलेले शेणखत, २५० ग्रँम सुफला (१५.१५.१५) आणि ५० ग्रँम फॉलीडॉल पावडर टाकून भरावेत.
- बहुवर्षीय वाणासाठी ४ X ४ मिटरवर लागवड करावी व एकवर्षीय वाणासाठी २.५ X २.५ मिटरवर लागवड करावी.
- शेवग्याच्या झाडास दरवर्षी १० किलो शेणखत, १७० ग्रँम युरीया, ४७० ग्रँम सुपर फॉस्फेट व १२५ ग्रँम म्युरेट आँफ पोटँश ही खते द्यावीत (माती परीक्षणानुसार खते द्यावीत).
- शेवग्याच्या झाडाची लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यानंतर पहिली व ७ ते ८ महिन्यांनी दुसरी छाटणी करावी. पहिल्या छाटणीच्या वेळी झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून एक मिटर अंतरावर छाटावे आणि दुस-या छाटणीच्यावेळी फांद्या छाटाव्यात.
- शेवग्याच्या लागवडीनंतर ८ ते १० महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा काढणीस तयार होतात. शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून सुमारे ३० ते ३५ किलो हिरव्या शेंगा मिळतात.
[Jun 19, 2007 3:47:14 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

jb777

40+ Contributor
Market yard
Maharashtra
India

  Joined: Dec 1, 2012
  Posts: 41
  Status: Offline


Re: शेवगा लागवडीबदल माहीती
   
शेवग्याची संपूर्ण माहितीसाठी http://www.siddhivinayakmoringa.com वेबसाईट पाहून घ्या
[Dec 1, 2012 6:15:41 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

agrocom

aAQUA Service Provider
Powai
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Aug 5, 2008
  Posts: 457
  Status: Offline

  Expert Name: Ajit Harpude
Phone Number: -


Re: शेवगा लागवडीबदल माहीती
   
माहिती बद्दल धन्यवाद !
----------------------------------------
Farm e-learning, m-learning, e-extension, Self-paced learning, participatory, interactive learning, tele-advisory, agri-education, distance education, continuing education and e-Kisan services.
[Dec 4, 2012 3:56:47 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard