Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > ढबु मिरची लागवडीबाबत  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 2 Replies 3415 Views Next Thread

sanjaybhosale

10+ Contributor
shirgoan
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Aug 8, 2006
  Posts: 13
  Status: Offline


ढबु मिरची लागवडीबाबत
   
मला ढबु मिरचीबाबत मागँदशँन मिळावे
----------------------------------------
maladbk.doc (27648 bytes) (Download Count: 259)

----------------------------------------
sanj
----------------------------------------
[Edit 2 times, last edit by sanjaybhosale at Aug 12, 2006 9:30:12 AM]
[Aug 8, 2006 7:35:22 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

hrushi4hort

10+ Contributor
satara
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Aug 4, 2006
  Posts: 11
  Status: Offline


Re: economics of capcicon
   
do u mean capcicum..................shimal mirchi/dhabbu mirchi\
[Aug 8, 2006 9:19:23 PM] Print Post    Weather Info    Email is hidden to Guest Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: D.B.Shirsath
Phone Number: 2112255207


Re: economics of capcicon
   
ढबू मिरचीबाबत आपणांस उपलब्ध माहीती पाठवित आहोत.
जाती -
१) कँलीफोर्नीया वंडर - ही अमेरीकेतून आलेली जात असून या जातीचे झाड मध्यम उंचीचे दणकट आणि उभट वाढणारे असून मिरची गर्द हिरव्या रंगाची, जाडजूड आणि घंटेच्या आकाराची असते. या मिरचीची साल जाड असून फळांना तिखटपणा नसतो. ही जात उशिरा तयार होते. या जातीचे १२ ते १५ टन उत्पादन मिळते.
२) यलो वंडर- ही ठेंगणी, उभट वाढणारी जात असून उशिरा येणारी, भरपूर उत्पादन देणारी आहे. मिरचीच्या फळांच्या आकार कँलिफोर्नीया वंडर सारखाच असून अजिबात तिखटपणा नसतो.
३) अर्का मोहिनी - ही जात भारतीय बागवानी अनुसंधान संस्था बंगलोर येथे विकसीत केलेली आहे. या जातीची फळे मोठी आणि गडद हिरव्या रंगाची असतात. फळाचे सरासरी वजन ८० ते १०० ग्रँम असते. या जातीचे दर हेक्टरी २० ते २५ टन उत्पादन येते.
४) अर्का गौरव - या जातीची झाडे उंच वाढणारी असून ही जात १४० दिवसात तयार होते. या जातीची फळे गडद हिरव्या रंगाची असून एका फळाचे वजन ७० ते ८० ग्रँम भरते या जातीचे दर हेक्टरी उत्पादन १८ ते २० टन येते.

- ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी ऑगस्ट किंवा नोव्हेंबर महिन्यात बियांची पेरणी करतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन -
ढोबळी मिरचीला हेक्टरी २० टन शेणखत, १५०किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश द्यावे. नत्र तीन भागांत विभागून लागवडीच्या वेळी, ३० दिवसांनी व ५०-६० दिवसांनी द्यावे.
मिरचीच्या बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फुलावर आणि फळावर असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
रोप लावणीनंतर १० दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड शेताला हलके पाणी द्यावे. त्यानंतर ५ दिवसांच्या किंवा एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणतः हिवाळ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. तर उन्हाळ्यात ६ ते ९ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंच पध्दतीनेही पाणी देता येते. त्यामुळे पाण्याची बचद होऊन उत्पादन वाढते.

किडी-
फुलकिडे (थ्रिप्स) - फुलकिडे हे किटक आकाराने अतिशय लहान असून त्यांची लांबी एक मिलीमिटरपेक्षाही कमी असते. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. हे किटक पाने खरवडून त्यातून बाहेर येणा-या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हे किटक खोडातील रसही शोषतात, त्यामुळे खोड कमजोर बनते,पाने गळतात आणि झाड सुकते. याशिवाय फुलकिड्यामुळे बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.या किडीच्या उपद्रवामुळे मिरचीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
उपाय - या किडीच्या बंदोबस्तासाठी रोपलावणीपासून ३ आठवड्यांनी पिकावर १५ दिवसांच्या अंतराने ८ मि.मी. डायमेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.किंवा रोप लागवडीनंतर १० दिवसांनी मोनोक्रोटोफॉस १५ मि.ली. १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
कोळी (माईटस) - या कीडीला पायाच्या चार जोड्या असल्यामुळे या किडीच्या समावेश किटकवर्गात होत नाही. ही किड अतिशय लहान असून किडीचा रंग पिवळसर करडा असतो. कोळी पानातील रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो. चुरडलेल्या पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात. फुलांच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फुले गळतात. फळे वेडीवाकडी होतात आणि फळांच्या आकार लहान राहतो.
उपाय - कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी २० ग्रँम पाण्यात मिसळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडांवर फवारणी करावी.
मावा - मावा हे किटक मिरचीच्या कोवळ्या पानांतील आणि शेंड्यातील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पाने येणे बंद होते.
उपाय - मिरचीच्या लागवडीनंतर १० दिवसांनी १५ मि.ली. मोनोक्रोटोफॉस १० लिटर पाण्यात मिसळून त्याची रोपांवर फवारणी करावी.
याशिवाय मिरचीवर आढळणा-या लीफ मायनरचेही नियंत्रण या किटकनाशकामुळे होते.

महत्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण -
१) रोपांची मर - (डँम्पींग ऑफ) हो रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. गादीवाफ्यात किंवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि त्यामुळे रोप कोलमडते.रोप उपटल्यावर सहज वर येते.
उपाय - या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३० ग्रँम कॉपर ऑक्सीक्लोराईड (५०टक्के) मिसळून हे द्रावण गादीवाफे किंवा रोपांच्या मुळाभोवती ओतावे.
२) फळे कुजणे आणि फांद्या वाळणे - (फ्रुट रॉट अँड डायबँक) हा रोग कोलीटोट्रीकम कँपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरता. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात.
उपाय - या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांच्या नाश करावा. तसेच झायरम किंवा डायथेन एम - ४५ किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध २५ ते ३० ग्रँम १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारावे.
भुरी - (पावडरी मिल्ड्यू) भुरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते. या रोगाच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.
उपाय - भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ३० ग्रँम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा १० मि.ली. कँराथेन १० लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
[Aug 21, 2006 4:39:04 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard