Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > जमीन सुधारणा व हिरवळीचे पिक लागवड बाबत.  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 2 Replies 1997 Views Next Thread

jiten81

10+ Contributor
Nashik
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Sep 26, 2004
  Posts: 11
  Status: Offline


जमीन सुधारणा व हिरवळीचे पिक लागवड बाबत.
   
खरीप हंगामात जमीन सुधारण्यासाठी व पिकांना फायदा होण्यासाठी कोणत्या हिरवळीच्या पिकांची लागवड करावी? या पिकांचे काय फायदे आहेत?

नाव - शिवराम नामदेव पवार
मु.पो. - कान्हूर - मेसाई
ता. शिरूर
जिल्हा - पुणे
----------------------------------------
JITEN
[Jun 22, 2006 3:25:55 PM] Print Post    Weather Info    Email is hidden to Guest Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.Prasad Kaledhonkar
Phone Number: 2112255207


Re: जमीन सुधारणा व हिरवळीचे पिक लागवड बाबत.
   
श्री, शिवराम पवार जमिन सुधारण्यासाठी खालीलप्रमाणे पिके घ्यावीत व उपाययोजना करावी.

- जमिनीचे आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. हिरवळीचे खत म्हणजे वनस्पतींचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे होय. यासाठी विविध प्रकारची हिरवळीची पिके शेतात वाढवून फुलोऱ्यात येण्यापूर्वीच जमिनीत गाडली जातात, ती जमिनीत कुजून त्याचे उत्तम खत बनते, उदा. ताग, धैंचा, मूग, उडीद, गवार, चवळी, शेवरी, बरशीम इ. याशिवाय शेताच्या बांधांवर, ओढ्याच्या किंवा नाल्याच्या कडेला गिरिपुष्प, सुबाभूळ झाडांची लागवड करून त्यांची हिरवी पाने व कोवळ्या फांद्या जमिनीत गाडून त्यांचे हिरवळीचे खत म्हणून उपयोग करता येतो.

जमिनीची भौतिक आणि जैविक गुणधर्म टिकवून सुपीकतेसाठी विविध पिकांना शेणखतांची शिफारस करण्यात आलेली आहे, परंतु शेतकऱ्यांकडे आज पुरेशा प्रमाणात व चांगल्या कुजलेल्या प्रतीच्या शेणखताची उपलब्धता होत नाही. त्यामुळे पूरक म्हणून हिरवळीची पिके घेतल्यास शेणखतांवरील खर्चात काही प्रमाणात बचत होऊ शकते. उदा. उसासाठी 25 टन प्रति हे. शेणखतांची शिफारस करण्यात आलेली आहे, म्हणजेच हेक्‍टरी पंधरा हजार रुपये खर्च येतो, परंतु हिरवळीचे पीक (ताग किंवा धैंचा) घेतल्यास त्यावरील एकूण खर्च पाच हजार रुपयांपर्यंत येतो, म्हणजेच शेणखताची उपलब्धता कमी असल्यास आपण हिरवळीच्या खतांचे नियोजन करून काही प्रमाणात सेंद्रिय खतावरील खर्च कमी करू शकता. त्यासाठी तीन वर्षांतून एकदा तरी हिरवळीची पिके शेतात गाडली पाहिजेत, म्हणजे जमिनीची सुपीकता टिकवली जाते.

हिरवळीची पिके जमिनीत गाडल्यावर सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या व वाढ चांगली होते. हिरवळीची पिके जमिनीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्ये शोषून घेतात आणि ही पिके गाडल्यानंतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वरच्या थरात वाढते. हिरवळीची पिके द्विदलवर्गीय असल्यास हवेतील नत्र जमिनीत स्थिरीकरण करण्यास मदत होते. उथळ/हलक्‍या जमिनींची जलधारणशक्ती वाढते आणि रासायनिक खतातील पाण्याद्वारे वाहून जाणाऱ्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो. भारी काळ्या, खोल जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होऊन वाफसा स्थिती लवकर येते.

हिरवळीच्या खतामुळे कडक घडण झालेल्या जमिनीची घडण सुधारते, तसेच घनता कमी होऊन हवा खेळती राहते. पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते. क्षारयुक्त जमिनीतील विरघळणारे विद्राव्य क्षार कमी होतात, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. हिरवळीच्या पिकांचा आच्छादनासारखा उपयोग होतो, त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो. धैंचासारखे हिरवळीचे पीक चोपण जमिनीत चांगल्या प्रकारे वाढत असल्याने चोपण जमिनीत सुधारण्यासाठी जिप्समसारख्या भूसुधारकाबरोबर धैंचा पीक जमिनीत गाडावे. ससबेनिया रोस्ट्रॅटा या हिरवळीच्या पिकाच्या फांद्यांवरही हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंच्या गाठी असतात.

हिरवळीच्या शेंगवर्गीय पिकांची वाढ चांगली होण्यासाठी जमिनीमध्ये 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. त्यामुळे हिरवळीच्या पिकांची वाढ चांगली होण्याबरोबरच हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या रायझोबियम जिवाणूंची वाढ आणि कार्यक्षमता वाढते. हिरवळीची पिके फुलोऱ्यात यावयास लागल्यानंतर जमिनीत गाडणे योग्य असते. हा कालावधी सर्वसाधारणपणे 45 ते 60 दिवसांचा असतो. यापेक्षा जास्त दिवस झाल्यास पिकातील रसाळपणा कमी होऊन तंतुमय पदार्थ वाढल्यामुळे कुजण्याची क्रिया मंदावून अपेक्षित लाभ मिळत नाही. हिरवळीचे खत जमिनीत गाडल्यानंतर अनेक प्रकारच्या जिवाणूंच्या कार्यामुळे हे पीक सडून जाते. जमिनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मात चांगले बदल होतात व नत्राची उपलब्धता वाढते. भात पिकासाठी गिरीपुष्पाचा हिरवा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावा व नंतरच भाताची लावणी करावी.
[Jun 22, 2006 3:53:31 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: D.B.Shirsath
Phone Number: 2112255207


Re: जमीन सुधारणा व हिरवळीचे पिक लागवड बाबत.
   
checked by KVK
[Jun 22, 2006 4:11:16 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard