Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > खतावीषय माहीती  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 3 Replies 2052 Views Next Thread

vikas_kiosk

20+ Contributor
Kharpudi
Maharashtra
India

  Joined: Dec 30, 2004
  Posts: 21
  Status: Offline

Farmer Name: somnath pawar
Farmer Phone: 2138 - 292326


खतावीषय माहीती
   
काकडीची जात हीमागी
आमच्या काकडीच्या मुळाशी ऊधई झाली आहे कृपया मला त्वरीत योग्य उपाय सुचवा. लागवड होऊण १२ दिवस झाले आहे. काकडीची लागवडीचा वेळी शेनखत व कोंबड खत दिले
आता कोणती खते दयावी [रासायनीक/सेंद़ीय].
तसेच रोग येऊ नये म्‍हणुन कोणती औषधे दयावी.

सोमनाथ पवार
----------------------------------------
[Edit 1 times, last edit by Rahul at Jan 23, 2006 1:11:28 PM]
[Jan 21, 2006 10:14:27 PM] Print Post    Email is hidden to Guest Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr. R L Parab
Phone Number: 2112255207


Re: खतावीषय माहीती
   
माती परीक्षणानुसार खते द्यायला हवीत.
काकडीसाठी एक हेक्टर क्षेत्रासाठी 5 पोती युरीया, 6 पोती सूपर फाँस्फेट व 2 पोती पोटँश द्यावे. ह्यापैकी अर्धी युरीयाची मात्रा संपुर्ण सुपर फॉस्फेट, पोटँशची मात्रा लागवडीच्यावेळी द्यावी. व उरलेली युरीयाची अर्धी मात्रा 30 दिवसानंतर द्यावी.
खते झाडाजवळ खोडापासुन थोड्या लांब अंतरावर द्यावीत (रांगोळी पध्दतीने) व मातीआड करावीत.
तसेच 5 किलो अझोटोबँक्टर, 5 किलो स्फुरद विरघळणारे जीवाणू व 4 किलो ट्रायकोडर्मा शेणखतासोबत द्यावे.
मादी फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी पिक दोन पानावर व चार पानावर असताना जिब्रेलिक अँसिड 10 ते 25 पी.पी.एम. (10 ते 25 मि.ग्रँ/ लिटर) किंवा एन.ए.ए. 100 पी.पी.एम. अशी फवारणी करावी.
थ्रीप्स पांढरीमाशी तुडतुडे इ. शोषण करणारया किडींच्या नियंत्रणासाठी मेटासिस्टॅक्स 10 मिली / क्लोरोपायरीफॉक्स 15 मिली मॅलॅथिऑन 20 मिली/मोनोक्रोटोफॉस 15 मिली/ रोगार 10 मिली कॉन्फीडॉर 2 मिली या पैकि एक औषध 10 ली पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारावे. नागअळीचा प्रादुर्भाव अढळल्यास 10 स्पार्क मिली / पॉलीट्रानसील 8 मिली 10 ली पाण्यातून फवारावे.

भूगेरे आढळल्यास कार्बारील 20 ग्रॅम / एन्डोसल्फान 14 मिली 10 ली पाण्यातून फवारावे.

भूरीसाठी कॅराथेन 10 मिली किंवा बाविस्टीन 15 ग्रॅम

करपा रोगासाठी 25 ग्रॅम डायथेन एम 45 / रिडोमिल 20 ग्रॅम 10 ली पाण्यातून फवारावे
फळात अळी आढळल्यास रासायनिक सापळ्याचा वापर करावा.

वेल पाण्याच्या पाटात येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

प्रसाद कलेढोणकर
कृषि विज्ञान केंद्र
बारामती
[Jan 23, 2006 1:11:38 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

bhima

Contributor
pabal
Maharashtra
India

  Joined: Feb 23, 2006
  Posts: 1
  Status: Offline


Re: खतावीषय माहीती
   
काकडीची जात हीमागी
आमच्या काकडीच्या पानावर नाग आळीपडली आहे.काय केले पाहीजेन ते लवकर सांगा[सेंद़ीय].पद्‍ध्‍ातीने सांगा काकडीला ४५ दिवस झाले आहे .

[S. B.pawar]
[Feb 23, 2006 10:53:21 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr. R L Parab
Phone Number: 2112255207


Re: खतावीषय माहीती
   
श्री. एस बी पवारजी
नागअळीच्या बंदोबस्तासाठी खालीलप्रमाणे एकात्मीक कीड नियंत्रणाचा अवलंब करावा.
- बागेतील तणांचा पुर्ण नायनाट करावा.
- -सुरुवातीच्या अवस्थेत किडलेली पाने काढून जाळावीत.
-चिकट सापळ्याचा (एकरी पाच) वापर करावा
-- प्राद्रुभावास सुरुवात झाली असेल तर निंबोळी अर्क ५ टक्केची (१०० लिटर पाण्यात ५ किलो ) फवारणी करावी.
- अथवा क्वीनॉलफॉस ५०० मिली किंवा असिफेट ६०० ग्रॅम किंवा होस्टथिआँन 1000 मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

श्री प्रसाद कलेढोणकर
कृषी विज्ञान केंद्र
बारामती
[Feb 24, 2006 12:10:44 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard