Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > Information about shewaga  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 5 Replies 2237 Views Next Thread

vikas_kiosk

20+ Contributor
Kharpudi
Maharashtra
India

  Joined: Dec 30, 2004
  Posts: 21
  Status: Offline

Farmer Name: Not Available
Farmer Phone: Not Available


Information about shewaga
   
आम्‍हाला शेतामध्‍ये शेवग्‍याची लागवड करायची आहे. तरी आपण आम्‍हाला मागॅदशॅन करावे .
[Nov 3, 2005 9:04:54 AM] Print Post    Email is hidden to Guest Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr. R L Parab
Phone Number: 2112255207


Re: Information about shewaga
   
शेवगा –
- शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते. सर्वसाधारणपणे २५ ते ३० डिग्री सें. तापमानात वाढ चांगली होते. तसेच तापमान ४० डिग्री सें. पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते.
- शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगरउताराच्या जमिनीत करता येते. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६-७.५ असावा.
- शेवग्यासाठी कोकण रुचिरा, पी.के.एम-१, पी.के.एम.-२, जाफना, चेम मुरंगा या वाणांचा वापर करावा.
- शेवग्याची अभिवृध्दी फाटे कलम अथवा बियापासून रोपे तयार करून केली जाते.
- फाटे कलम न मिळाल्यास पाँलीथीनच्या पिशवीत बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी. एक ते दोन महिन्यांची रोपे लागवडीकरीता वापरावीत. हेक्टरी लागवडीकरीता ५०० ग्रँम बियाणे लागते.
- लागवड करण्यापुर्वी पावसाळ्यापुर्वी ६० X ६० X ६० आकाराचे ख़ड्डे घ्यावेत. हे खड्डे चांगली माती एक घमेले कुजलेले शेणखत, २५० ग्रँम सुफला (१५.१५.१५) आणि ५० ग्रँम फॉलीडॉल पावडर टाकून भरावेत.
- बहुवर्षीय वाणासाठी ४ X ४ मिटरवर लागवड करावी व एकवर्षीय वाणासाठी २.५ X २.५ मिटरवर लागवड करावी.
- शेवग्याच्या झाडास दरवर्षी १० किलो शेणखत, १७० ग्रँम युरीया, ४७० ग्रँम सुपर फॉस्फेट व १२५ ग्रँम म्युरेट आँफ पोटँश ही खते द्यावीत (माती परीक्षणानुसार खते द्यावीत).
- शेवग्याच्या झाडाची लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यानंतर पहिली व ७ ते ८ महिन्यांनी दुसरी छाटणी करावी. पहिल्या छाटणीच्या वेळी झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून एक मिटर अंतरावर छाटावे आणि दुस-या छाटणीच्यावेळी फांद्या छाटाव्यात.
- शेवग्याच्या लागवडीनंतर ८ ते १० महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा काढणीस तयार होतात. शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून सुमारे ३० ते ३५ किलो हिरव्या शेंगा मिळतात.

Prasad kaledhonkar
kvk Baramati.
[Nov 9, 2005 11:09:25 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

kiran_123

70+ Contributor
Yewala
Maharashtra
India

  Joined: Oct 12, 2007
  Posts: 76
  Status: Offline


Re: Information about shewaga
   
शेवग्याची फूलगळ थांबविण्यासाठी काय करावे
[Dec 27, 2007 10:10:11 AM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: Information about shewaga
   

शेवग्याची फूलगळ -

शेवग्याची फूलगळ थांबविण्यासाठी प्रत्येक झाडाला पुरेशी खते देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रत्येक झाडाला पावसाळ्याच्या सुरवातीला 10 किलो शेणखत, 75 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद व 50 ग्रॅम पालाश द्यावे. फलधारणा भरपूर होण्यासाठी फुले आल्यानंतर 2-4-5 टी या संजीवकाचा 10 पीपीएम तीव्रतेचा फवारा द्यावा. तसेच 0.20 टक्के सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारा मार्च व जुलै महिन्यांत द्यावा.

शेवग्यावरील पाने गुंडाळणा-या अळीच्या नियंत्रणासाठी फेनव्हलरेट 20 इसी 250 मि. लि. किंवा डेकामेथ्रीन 2.8 इसी, 500 मि.लि. किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 700 मि.लि. 500 लिटर पाण्यातून हेक्‍टरी झाडावर फवारावे.

कीटकनाशकांची 15 दिवसांच्या अंतराने आवश्‍यकतेनुसार आलटून पालटून फवारणी करावी. शेवग्याची फूलगळ रोखण्यासाठी झाडाला पावसाळ्यात 10 किलो शेणखत, 75 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद व 50 ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावे. फुले आल्यानंतर 2-4-5 टी या संजीवकाचा 10 पीपीएम तीव्रतेचा फवारा द्यावा. तसेच 0.2 टक्के सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारा मार्च व जुलै महिन्यात झाडावर द्यावा. म्हणजे झाडावरील फूलगळ कमी होऊन जास्तीत जास्त शेंगा मिळतील.

 

 

 

 

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)

 


----------------------------------------
[Edit 1 times, last edit by baramati at Dec 27, 2007 11:47:45 AM]
[Dec 27, 2007 11:45:43 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

jb777

40+ Contributor
Market yard
Maharashtra
India

  Joined: Dec 1, 2012
  Posts: 41
  Status: Offline


Re: Information about shewaga
   
शेवग्याची संपूर्ण माहितीसाठी http://www.siddhivinayakmoringa.com वेबसाईट पाहून घ्या
[Dec 1, 2012 6:15:52 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

agrocom

aAQUA Service Provider
Powai
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Aug 5, 2008
  Posts: 450
  Status: Offline

  Expert Name: Ajit Harpude
Phone Number: -


Re: Information about shewaga
   
माहिती बद्दल धन्यवाद !
----------------------------------------
Farm e-learning, m-learning, e-extension, Self-paced learning, participatory, interactive learning, tele-advisory, agri-education, distance education, continuing education and e-Kisan services.
[Dec 4, 2012 3:56:20 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard