Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > चिकू लागवड  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 3 Replies 4319 Views Next Thread

samgarud

10+ Contributor
pune
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Jul 22, 2009
  Posts: 16
  Status: Offline


चिकू लागवड
   
चिकू लागवडीविषयी माहीती
[Jul 23, 2009 11:56:34 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: चिकू लागवड
   

चिकू लागवड -

चिकू पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी, बारमाही पाण्याची सोय असणारी जमीन चांगली असते. भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट आणि कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होते.

चिकूची लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. एप्रिल - मे महिन्यांत कलमांच्या लागवडीसाठी 10बाय 10 मीटर अंतरावर 1 बाय1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणून वाळवीच्या नियंत्रणासाठी मिथिल पॅराथिऑन किंवा 5 टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी.

त्यानंतर खड्डे चांगली माती, चार घमेली शेणखत, 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी सरकारमान्य रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठातूनच कलमे खरेदी करावीत. लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यांत करावी. कलमांना लागवडीनंतर काठीचा आधार द्यावा. सुरवातीला पहिल्या दोन वर्षांत खुंटावरील वारंवार येणारी फूट काढून टाकावी. कलमांची पूर्ण वाढ होण्यास 8 वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या सहा वर्षांच्या कालावधीत चिकू लागवडीमध्ये आंतर पीक म्हणून भाजीपाला, फुलझाडे, कडधान्यांचे पीक घेता येते.

लागवडीनंतर पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास एक घमेले शेणखत, 300 ग्रॅम युरिया, 900 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दोन हप्त्यात सम प्रमाणात द्यावे. पहिला हप्ता ऑगस्टमध्ये व दुसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या दुप्पट मात्रा द्यावी. कलमांना आळे पद्धतीने पाणी देताना झाडाच्या विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करावे. झाडाला सतत पाणी मिळेल, परंतु पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबरीने तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा देखील वापर करता येतो.

 

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)


----------------------------------------
[Edit 1 times, last edit by baramati at Jul 23, 2009 2:18:39 PM]
[Jul 23, 2009 2:17:46 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

samgarud

10+ Contributor
pune
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Jul 22, 2009
  Posts: 16
  Status: Offline


Re: चिकू लागवड
   
estimation cost of drip system for sapota in 1 acre?
[Jul 27, 2009 10:37:23 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: चिकू लागवड
   

Estimated cost for installation of drip irrigation system for different spacing is given in following attachement-

 

[Above information is based on recommendations from National Agriculture Research System. The Effectiveness of the recommendations varies from place to place with changes in natural resource and climate. Farmers are advised to use the information on their own responsibility. KVK Baramati shall not be responsible for any consequences.]


----------------------------------------
drip.JPG (101088 bytes) (Download Count: 2527)
Zoom In | Zoom Out | Normal
drip.JPG
----------------------------------------
[Edit 1 times, last edit by baramati at Jul 27, 2009 2:44:10 PM]
[Jul 27, 2009 2:43:06 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard