Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > हळद  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 2 Replies 590 Views Next Thread

kiran_123

70+ Contributor
Yewala
Maharashtra
India

  Joined: Oct 12, 2007
  Posts: 76
  Status: Offline


हळद
   
हळद लागवडीसाठी कोणत्या जाती निवडाव्यात लागवडीचे नियोजन कसे करावे
[Apr 1, 2011 3:15:44 PM] Print Post Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15632
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: हळद
   

हळद लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम काळी, नदीकाठची पोयटा माती असलेली जमीन चांगली असते. शक्य तो चुनखडीयुक्त व चोपण जमीन हळद लागवडीसाठी टाळावी. लागवडीपूर्वी उभी-आडवी नांगरट आणि कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी. लागवडीसाठी वाणांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. लागवडीसाठी फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा, टेकूरपेटा, राजापुरी या जातींची निवड करावी.

हळदीची लागवड 15 मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीच्या दृष्टीने 75 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूस 37.5 सें.मी. बाय 30 सें.मी. अंतरावर वरंब्यामध्ये लागण करावी. पिकाला ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन करायचे असेल, तर 25 सें.मी. उंचीचे आणि 120 सें.मी. रुंदीचे गादीवाफे करावेत. या गादीवाफ्यांवर 30 सें.मी. बाय 30 सें.मी. अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी प्रति हेक्ट री 25 ते 30 क्विंटल गड्डे बेणे वापरावे. बियाणे चांगल्या प्रतीचे आणि रोगमुक्त असावे. लागवडीपूर्वी हे बेणे 20 मि.लि. क्विनॉलफॉस (25 ई.सी.) अधिक दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यू.पी.) अधिक दहा लि. पाणी किंवा 10 मि.लि. डामेथोएट (30 ई.सी.) अधिक 30 ग्रॅम मॅन्कोझेब (75 डब्ल्यू.पी.) अधिक दहा लिटर पाण्याच्या द्रावणात किमान 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावे. दहा लिटरचे द्रावण 100 ते 200 किलो बेण्यास वापरावे.

हळदीमध्ये घेवडा, मुळा, पालेभाज्या, मेथी, मिरची ही आंतर पिके घेता येतात. लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 50 ते 80 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. रासायनिक खतांची मात्रा प्रति हेक्ट्री 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद व 100 किलो पालाश माती परीक्षण अहवालानुसार द्यावी. लागवडीपूर्वी 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावे. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांमध्ये लागवडीनंतर सहाव्या आठवड्यात व 10 व्या आठवड्यात भरणी करते वेळी द्यावी. भरणीच्या वेळी हेक्ट री दोन टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर करावा.

हळदीचे कंद उघडे राहू नयेत म्हणून लागवडीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी भरणी करावी. भरणी करताना शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा द्याव्यात. गरजेनुसार पिकाची दोन ते तीन वेळा खुरपणी करावी. लागवडीनंतर पाच ते सात दिवसांच्या अंतराने, पावसाळ्यात पाऊस नसल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने, तर हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांच्या अंतराने जमिनीच्या प्रतीनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. काही वेळा हळदीमध्ये कंद कूज दिसून येते. यासाठी पाच किलो ट्रायकोडर्मा प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावे किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण रोपांच्या मुळात ओतावे.

हळदीवर कंदमाशी, पानांतील रस शोषण करणारे ढेकूण या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव ओळखून वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक संरक्षण करावे. काही वेळा पानांवर करपा आणि ठिपके हे रोग दिसून येतात, या रोगांचेही वेळीच नियंत्रण करावे. पीक काढणीस आठ महिन्यांनी तयार होते. काढणीपूर्वी जमिनीच्या प्रतीनुसार 20 दिवस अगोदर पिकाचे पाणी तोडावे. त्यानंतर कंद कुदळीने खणून काढावेत. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ओल्या हळदीचे 250 ते 350 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

 

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)
----------------------------------------
[Edit 1 times, last edit by baramati at Apr 1, 2011 4:39:31 PM]
[Apr 1, 2011 4:25:07 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15632
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: हळद
   
...............................
[Apr 1, 2011 4:31:42 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 



 

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard