Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
Crops / फसल > Dhobli mirci  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 2 Replies 652 Views Next Thread

kishorahire

Contributor
Malegaon
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Nov 17, 2009
  Posts: 6
  Status: Offline


Dhobli mirci
   
sir,dhobli mirchi chi lagwad kontya mahinyat karavi.jene karun bajar bhav changla milel.var.vavasthapan kase karave (net kotya prakarchi vapravi)
[Jul 23, 2010 10:07:03 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: Dhobli mirci
   

ढोबळी मिरची या पिकाला दिवसाचे सरासरी 25 अंश से.पर्यंत तापमान मानवते. दहा अंश से.हून कमी तापमान झाल्यास व धुके पडल्यास पीकवाढीवर परिणाम होतो किंवा तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळे पोसत नाहीत. लागवड ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यात करावी. इतर हंगामांत लागवड शेडनेट वापरून किंवा हरितगृहात करता येते.

लागवडीसाठी चांगली कसदार व सुपीक तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी, सामू सहा ते सात असलेली जमीन निवडावी. ढोबळी मिरचीच्या 20 ते 25 प्रचलित जाती आहेत. खासगी कंपन्यांच्या संकरित जाती बाजारपेठेत उपलब्ध आहेत. लागवडीसाठी अर्का गौरव, अर्का मोहिनी, कॅलिफोर्निया वंडर, यलो वंडर या जातींची शिफारस करण्यात आली आहे.

रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा स्वच्छ असावी. जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करून तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे. वाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात.नंतर बी पेरणी करावी. प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्‍टर ढोबळी मिरची लागवड करण्यासाठी सुमारे 400 ते 500 ग्रॅम बियाण्याची गरज असते. जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.

रोपे सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर पुनर्लागवडीस तयार होतात. लागवड करताना 15 सें. मी. उंचीची आणि आठ ते दहा पाने असलेली निरोगी, सशक्त रोपे निवडावीत. रोपांवर दर पंधरा दिवसांच्या अंतराने योग्य प्रमाणात कीटक व बुरशीनाशकांच्या फवारण्या घ्याव्यात. रोपांना पुरेसे पाणी द्यावे. जमिनीची पूर्वमशागत करून रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी 60 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. चांगली जोमदार रोपे सरीच्या दोन्ही बाजूंना बगलेत 30 सें.मी. अंतरावर लागवड करावी. एका ठिकाणी एक रोप लावावे. लागवड सायंकाळी चारनंतर करावी आणि रोपांना पाणी द्यावे. पुन्हा दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे.

हेक्‍टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले शेणखत तसेच माती परीक्षण अहवालानुसार 150 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश पिकाला द्यावे. संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. एक लागवडीनंतर एक महिना व पन्नास दिवसांच्या अंतराने विभागून द्यावे. रासायनिक मिश्रखतांचा उपयोग केल्यास फायदा अधिक होतो.
पीकवाढीच्या अवस्थेत योग्य वेळी पाण्यात विरघळणाऱ्या खतांची फवारणी करावी. लागवडीपासून सुरवातीच्या वाढीसाठी नियमित पाण्याची आवश्‍यकता असते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

 

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)


----------------------------------------
[Edit 1 times, last edit by baramati at Jul 24, 2010 12:03:24 PM]
[Jul 24, 2010 11:56:29 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 

baramati

Certifed Expert
Baramati, Pune Dist
Maharashtra
India

Member's Photo

  Joined: Dec 1, 2003
  Posts: 15643
  Status: Offline

  Expert Name: Mr.S.V.Potekar
Phone Number: 02112-255207


Re: Dhobli mirci
   
.......................................
[Jul 24, 2010 11:58:15 AM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top 



 

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard